शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, उपकुलसचिव गजानन पळसे, सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर, अनिल साळोखे, यशोधन बोकील यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते.