डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘महानोकरी महोत्सवा’चे आयोजन
पस्तीस कंपन्यामध्ये आठशे जागांसाठी भरती
सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान
मेगा जॉब फेअर मार्च २०२५ चे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगा जॉब फेअर’ चे आयोजन येत्या मंगळवारी (दि १८) करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक डॉ गिरीश काळे यांनी दिली.

विद्यापीठातील नायलेट (NIELIT) येथे छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या असून विविध पदविका, पदवी तसेच पद्व्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअर मध्ये नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथील साई इलेक्ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग, कार्ल्सबर्ग इंडिया, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, लाईफलाईन डिव्हाइसेस प्रा ली, आयसीआयसीआय, ऍक्सिस बँक, यशश्री प्रेस, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, अल्ट्रा ब्युटी केअर, तसेच आय टी ची मागणी असलेल्या शार्कवेब आयटी, इंडियन इंटरनेट सोल्युशन्स प्रा ली तसेच वेलवीन पॅकेजिंग, सोडेस्को इंडिया, एस डब्ल्यू मल्टी मेडिया, इन्फिनिटी टेक रिसोर्सेस तसेच इम्फासिस या प्रख्यात कंपन्या तसेच इतरही काही आशा पस्तीस कंपन्या ८०० रोजगार संधी सहित सहभागी होणार आहेत.
१८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईट वरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल च्या लिंक देण्यात अली आहे. विद्यार्थ्यांनी १८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजेपासून विद्यापीठातील नायलेट (NIELIT) येथे मुलाखतीसाठी किमान पाच बायो डेटा च्या प्रति घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ गिरीश काळे, ‘नायलेट’चे के लक्ष्मण व मॅनयुनायटेड कोर्पोरेट चे रवींद्र कंगराळकर यांनी केले आहे.