मिल्लीया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने तर्फे कामखेडा येथे महावृक्ष लागवड
झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा – सरपंच बिलाल पटेल
बीड : मिल्लीया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “एक पेड मांँ के नाम” या मोहिमे अंतर्गत दि १८/०७/२०२४ गुरुवार रोजी मौजे कामखेडा ता बीड येथे महावृक्ष लागवड अभियान संपन्न झाले. या मोहिमेत ९०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून plant4mother अंतर्गत महावृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात झाली. याप्रसंगी कामखेडा येथील सरपंच बिलाल पटेल यांच्या उपस्थितीत व उपप्राचार्य डॉ सय्यद एच के यांच्या हस्ते शिसू, चिंच, करंज, कांचन, काटसावर व सिताफळाची झाडे लावण्यात आली.
सरपंच बिलाल पटेल यांनी समाजामध्ये पृथ्वीबद्दल जागरूकता निर्माण करणे, हिरवाईचे संगोपन करणे व वृक्ष लागवडीचे महत्त्व, पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे आवश्यक असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करावी असे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक, प्रो मिर्झा असद बेग, डॉ शेख एजाज परवीन, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका प्रत्येकाने वृक्ष लावले.
एक पेड माँ के नाम, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दिल्या.
यावेळी गावकऱ्यांना वृक्षरोप वितरण करून, लागवड करावी व करावे त्याचे संगोपन करावे असे सांगण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच शेख शाफिक, ग्रामपंचायत सदस्य शेख मुसा, तलाठी दिनेश गायकवाड, अय्युब पठाण, पशुधन पर्यवेक्षक डॉ असद पठाण, परिचर कैलास पवार, शेख सलीम, दस्तगीर पठाण, भारत दादा नेवडे गावातील व परिसरातील नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.