डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मधु कांबीकर यांना ‘जीवनसाधना पुरस्कार’ प्रदान
औरंगाबाद : सार्वजनिक विद्यापीठासमोर आर्थिक क्षेत्रासह प्रचंड आव्हान असून त्यावर मान करुन आपल्या विद्यापीठाला प्रगतीपथावर नेऊ. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करु, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा ‘जीवन साधना पुरस्कार’ प्रख्यात अभिनेत्री तथा लोककलावंत मधू कांबीकर यांना प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वस्थामुळे मधु कांबीकर या सोहळयास उपस्थित राहु शकल्या नाहीत. त्यांचे गुरु पांडुरंग घोटकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. विद्यापीठाच्या ६५ व्या वर्धापन दिन सोहळयात बुधवारी (दि.२३) नाटयगृहात हा सोहळा झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ वा वर्धापन दिनी मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी १०ः३० वाजता विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव ज्येष्ठ सनदी अधिकारी जे.पी.डांगे अध्यक्ष, (प्रवेश नियमन प्रशिक्षण) यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ.अकुंश कदम यांच्यासह काशिनाथ देवधर, डॉ.योगिता पाटील, लोककलावंत पांडुरंग घोटकर, संचालक डॉ.मुस्तजिब खान आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, अवधी ९ महाविद्यालये व तीन हजार विद्यार्थी यासह सुरु झालेले विद्यापीठ आज पासष्टी पार करीत आहे. चारशेहून अधिक विद्यार्थी संख्येसह अनेक नवीन अभ्यासक्रम पदव्यूत्तर विभागात राबविले. शिक्षक, कर्मचा-यांची कमतरता, आर्थिक प्रश्न यासह विविध प्रश्नांवर मात करुन विद्यापीठाला पुढे नेऊ, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्यातील अत्यंत उत्कृष्ट प्रशासन व शैक्षणिक गुणवत्ता असलेले ओळख म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विद्यापीठाला योग्य दिशा दिली. प्रवेश नियम प्राधिकरणच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. यावेळी विविध परिक्षातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे लेखन-वाचन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी केले. विद्यापीठाच्या प्रगतीचा आढाव प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविकात घेतला. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी आभार माले.

कांबीकरांच्या गुरुंना भावना अनावर :
गरु-शिष्य, भाऊ-बहिएा, ढोलकी-घुंगरु, वादक-नर्तिका अशा नात्याने मधु कांबीकर व पांडुरंग घोटकर यांचे ऋणानूबंध पन्नास वर्षांपासून टिकून आहे. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर व पांडुरंग घोटकर यांनी मधु कांबीकर यांना लावणीचे शिक्षण दिले. तर बाळासाहेब गोखले यांनी कथ्यकचे प्रशिक्षण दिले. १९६६ ते२०१६ या काळात घोटकर व कांबीकर या गुरु-शिष्याची जोडीने अनेक लावण्या सादर केल्या. हा सगहा प्रवास मांडतांना पांडुरंग घोटकर यांना अश्रूंना मोकळी वार करुन दिली. अंथरुणावर खिळून पडलेल्या मधु कांबीकरांची आठवण ठेऊन गौरविले याबद्दल पांडुरंग घोटकर यांनी विद्यापीठ व कुलगुरु यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.