सौ के एस के महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या उपस्थितीत दिनांक २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या जीवन व कार्याची माहिती विशद करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी न्यु इंग्लिश स्कूल, द डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. ज्या आजही गुणवत्तेसाठी प्रसिध्द आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठीतील तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करून स्वातंत्र्य आंदोलनाविषयी जनजागृती सुरू केली. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालवादी गटाचे अध्यक्ष म्हणून स्वतंत्र आंदोलन तीव्र केले व देशाला स्वराज्य,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसुत्री दिली.
स्वराज्य माझा जन्म सिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा करून १८९३ मध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीकरिता नागरिकांना एकत्रित केले. त्यांची ओरिएन द आर्क्टिटीक होम वेदा आणि गीता रहस्य हे कर्मसिध्दांवरील ग्रंथ प्रसिध्द आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ खान एस, कमवि डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालींदर कोळेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पांडूरंग सुतार व आभार डॉ अनिता धारासुरकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.