उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्थानिक माध्यम अभ्यास दौरा संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील एम ए. एमसीजे आणि पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्थानिक माध्यम अभ्यास दौरा जळगाव शहरात आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि दै. लोकमत कार्यालयाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील एमए.एमसीजे आणि पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमातील प्रात्यिक्षकाचा एक भाग म्हणून विद्यार्थांचा स्थानिक माध्यम अभ्यास दौरा नुकताच पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि दै. लोकमत कार्यालयाला भेटी दिल्या. हा अभ्यास दौरा माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या समवेत विभागातील शिक्षक डॉ. गोपी सोरडे, अॅड. सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
माध्यम अभ्यास दौ-याअंतर्गत विद्यार्थ्यांनी सुरूवातीला जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून शासनाच्या जनसंपर्का विषयी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट दिली. राजशिष्टाचार विभागाच्या नायब तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रशासकीय कार्यप्रणाली आणि कामकाज यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्याथ्र्यांनी निवडणूक शाखा, संजय गांधी योजना विभाग, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, राजिशष्टाचार विभाग, कुळकायदा विभाग आणि गृहविभागांना भेटी देवून येथील अधिकारी विजयसिंह सूर्यवंशी, प्रदीप झांबरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी जळगाव औद्योगिक वसाहतीतील दै. लोकमत कार्यालयाला भेट देवून वृत्तपत्र निर्मितीबाबतची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी संपादक रवी टाले यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधून मुद्रित माध्यमाचे महत्त्व आणि विश्वासर्हता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारितेच्या बारकाव्यांबाबत त्यांनी विद्यार्थांना टिप्स दिल्या. त्यानंतर संपादकीय विभाग, प्रिंटीग विभागाची पाहणी केली. याप्रसंगी वृत्तपत्र छपाई यंत्राबाबत मॅकेनिकल इंजिनियर विजयसिंह केकरवाल यांनी माहिती दिली.