श्री बंकटस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन आणि शाश्वत विकास या विषयावर व्याख्यान संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड लोकप्रशासन विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “लोकप्रशासन आणि शाश्वत विकास” या विषयावर संपन्न करण्यात आला. वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दीपमाला माने लोकप्रशासन विभाग यांनी केले. या लोकप्रशासन एक दिवशी वेबिनारचे अध्यक्ष उद्घाटक श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे सर यांनी केले उद्घाटन करताना त्यांनी लोकप्रशासन हे मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच लोकप्रशासनात प्रशासकाची जबाबदारी पार पाडताना प्रशासकाची शैली, कार्य करण्याची पद्धत या संदर्भात मार्गदर्शन करून आजच्या वेबिनारचे उद्घाटन केले.
लोकप्रशासनाच्या वेबिनारला पहिल्या सत्रात लाभलेले प्रमुख अध्यक्ष वक्ते डॉ. प्रीती पोहेकर स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड येथील प्राचार्य तसेच लोकप्रशासन विभाग प्रमुख होय. यांचा परिचय प्राध्यापक महाडिक सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी करून दिला. तसेच आजच्या वेबिनारला लाभलेले दुसऱ्या सत्रात डॉ. सुशील कांबळे सर केंद्रीय विद्यापीठ जम्मू लोकप्रशासन विभाग प्रमुख यांचा परिचय प्राध्यापक महाडिक सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी करून दिला. त्यानंतर डॉ. प्रीती पोहेकर मॅडमने पहिल्या सत्रात “शाश्वत विकासातील आव्हाने व उपाय” या विषयावर मार्गदर्शन करताना शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टे जसे की दारिद्र्य, भूक संपवणे, आरोग्य, किमान कौशल्यावर भर, स्त्रिया या पुरुषापेक्षा किती टक्के दारिद्र्य आहेत, ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे, वाढत्या लोकसंख्येकरता शेतीवर जास्त भर देण्याकरिता अवजारे तांत्रिक अवजारांवर जास्त भर देणे. जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन अन्नधान्याचा साठा भरपूर प्रमाणात करून ठेवणे, समानता, पाणी अशी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यावर उपाययोजना सुचविल्या अगदी सोप्या स्पष्ट भाषेत त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात डॉ. सुशील कांबळे केंद्रीय विद्यापीठ जम्मू लोकप्रशासन विभाग यांनी “शासन विकासातील प्रशासनाची भूमिका” याविषयावर मार्गदर्शन केले.