डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सार्वत्रिक मानवी मुल्यांचा रोल’ या विषयावर व्याख्यान संपन्न
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालीत डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे सत्र २०२४ वर्षामध्ये प्रथम वर्ष एम बी बी एस अभ्यासक्रमाकरीता प्रवेशीत व वरिष्ठ बॅचचे विद्यार्थी तसेच पालकांची संयुक्तीक सभा मंगळवार, दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. त्याअनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील स्थापत्य विभागाचे माजी प्राध्याक डॉ संदीप ताटेवार यांचे ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सार्वत्रिक मानवी मुल्यांचा रोल’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. याकरीता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ ताटेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ रुग्णांवर चांगले उपचार करण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या जीवनातील तणावाचा सामना करण्यासाठी तांत्रिक कौशल्यांसह मानवी मूल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा. व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ सुषमा पांडे, डॉ दिपाली विधळे, डॉ प्रकाश कुटे तसेच सभागृहात शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेडिकल एज्युकेशन युनिट समन्वयक डॉ सुषमा पांडे यांनी कार्यक्रमाचे सुरूवातीला डॉ संदीप ताटेवार यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रियल तोलानी यांनी केले.