छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन

आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उपक्रम

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने डॉ श्रीकांत जिचकार स्मृती व संशोधन केंद्र सभागृहामध्ये 6 जून रोजी सकाळी 11:00 वाजता शिवछत्रपतींच्या 353 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रसिद्ध शिव व्याख्याते, छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा, जि चंद्रपूरचे प्राचार्य डॉ दिलीप चौधरी यांचे ‘शिवराज्याभिषेक एक क्रांतिकारक घटना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

Advertisement
Lecture organized at Sant Gadge Baba Amravati University on June 6th on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj's coronation day

‘एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन’ अभ्यासक्रम केवळ अमरावती विद्यापीठात सन 2021 पासून यशस्वीपणे सुरू आहे. छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले व 6 जून 1674 या दिवशी रायगडावर विधिवत राज्याभिषेक करून घेतला. मध्ययुगीन इतिहासाच्या कालखंडातील ही अभिनव घटना संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या इतिहासावरही परिणामकारक ठरली आहे. आज अनेक देशांत छत्रपतींच्या व्यवस्थापन व युध्द कौशल्यांचा नव्याने अभ्यास केला जात आहे.

शिवछत्रपतींचे एकूण जीवनचरित्र, स्वराज्याची निर्मिती, यवनी सत्तांना दिलेला शह व राज्याभिषेक यावर या व्याख्यानातून मांडणी होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाच्या व्यवस्थापन व अधिसभेचे सन्माननीय सदस्य, गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. अभ्यासक, संशोधक, शिवप्रेमी, विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *