शिवाजी विद्यापीठात ‘मराठीतील स्त्रियांचे विनोदी लेखन’ या विषयी व्याख्यान संपन्न
स्त्रियांच्या विनोदी लेखनात आयुष्याकडे खेळकरपणे बघण्याची दृष्टी – डॉ. सुषमा पौडवाल
कोल्हापूर : स्त्रियांच्या विनोदी लेखनात आयुष्याकडे खेळकरपणे बघण्याची दृष्टी आहे असे मत डॉ. सुषमा पौडवाल यांनी व्यक्त केले. त्या शिवाजी विद्यापीठ, मराठी विभाग आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमाला अंतर्गत ‘मराठीतील स्त्रियांचे विनोदी लेखन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. डॉ. पौडवाल पुढे म्हणाल्या की, मराठीवाङ्मयात स्त्री लेखिकांनी केलेले विनोदी लेखन संयत आणि संयमित स्वरूपाचे आहे. तसेच त्यांनी मराठी वाङ्मयाच्या मौखिक परंपरेपासून आधुनिक काळापर्यंत स्त्रियांच्या वाङ्मयातून व्यक्त झालेला विनोद, त्याचे स्वरुप, शैली आणि स्त्रियांच्या विनोदी लेखनाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन याबाबत महत्त्वपूर्ण विवेचन केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी
अध्यक्षीय मनोगतात मराठीतील विनोदी लेखनाची परंपरा व अभ्यास याबाबत भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय सुस्मिता खुटाळे यांनी करून दिला. यावेळी डॉ. अरूण शिंदे, सीमा देशमुख तसेच विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले.