नागपूर विद्यापीठात ‘पेंच येथील वन्यजीव पर्यटन’ विषयावर व्याख्यान संपन्न
विद्यापीठ प्रवास व पर्यटन विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागात “पेंच येथील वन्यजीव पर्यटन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ प्रभुनाथ शुक्ला यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपसंचालक डॉ प्रभूनाथ शुक्ला यांनी आपल्या अतिथी व्याख्यानात पेंच व्याघ्र प्रकल्पाची स्थापना, वन्यजीव संबंधीत शासकीय मार्गदर्शक तत्वे, वन्यजीव संरक्षण कायदे, पेंच प्रकल्पात जाण्याचे विविध प्रवेशद्वार, उपलब्ध सुविधा, व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरळीत चालावितांना येणारी आव्हाने आणि उपक्रम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पेंच येथे सध्या राबत असलेली व्याख्यान केंद्रे, विविध समुदाय विकास योजना आणि वन्यजीव क्षेत्रात उपलब्ध रोजगार संधी यांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाशी संबंधीत प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.
विभाग प्रमुख डॉ प्रियदर्शी खोब्रागडे यांनी वक्त्यांचे स्वागत केले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात या प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाशी संबंधीत लघु आणि दीर्घ शोध प्रकल्पात मोलाची सहायता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन दीपक उके यांनी तर आभार नरेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता डॉ अरविंद उपासनी, डॉ अमरदीप बारसागडे, प्रा मंजुषा डोंगरे, प्रा शोभना मेश्राम, प्रा परिमल सुराडकर, प्रा मनोज वाहने आणि पदवी प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी रामदास बागडे, जयंत साठे, खुशी कांबळे, आफ्रिन अन्सारी, भूमिका गावंडे, यश डोमकावळे, पूजा बागडे, काजल चालुरकर, अभिषेक नाथ, विवेक कांबळे, करुणा ढोणे यांनी महत्वाची भूमिका बजावली.