अमरावती विद्यापीठात ‘कृषी तंत्रज्ञानातील पध्दती’ या विषयावर पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन
‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ चा समारोप व बक्षिस वितरण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, एन सी एस टी सी, डी एस टी, भारत सरकार राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या सहकार्य व संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 28 फेब्राुवारी रोजी ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या थीमवर राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम, बक्षिस व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दि. 19 मार्च रोजी दु. 3.00 वा. विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून एस पी के अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी, अमरावतीचे पद्मश्री गुरुजी सुभाष पाळेकर, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागाच्या संचालक डॉ स्वाती शेरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने ‘कृषी तंत्रज्ञानातील पध्दती’ या विषयावर पद्मश्री गुरूजी सुभाष पाळेकर यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ तुषार देशमुख, राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ अनिता पाटील यांनी केले आहे.