शिवाजी विद्यापीठात क्रीडा पत्रकार शारदा उग्र यांचे व्याख्यान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्र यांचे क्रीडा पत्रकारिता विषयावर व्याख्यान होणार आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत हा कार्यक्रम होईल.
शारदा उग्र यांनी द हिंदू, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, इएसपी एन अशा अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्र समूहात तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकारिता केली आहे. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ त्या क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. क्रीडा पत्रकार आणि पत्रकारितेची आवड असणाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.