राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डिक्कीचे संस्थापक चेअरमन पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे यांचे शुक्रवारी व्याख्यान
विद्यापीठ पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे आयोजन
नागपूर : डिक्कीचे संस्थापक चेअरमन तथा आयआयएम जम्मूचे चेअरमन पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवार, दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता व्याख्यान होणार आहे.

पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महादेव हरी वाठोडकर व्याख्यानमालेत पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे हे ‘गिअरिंग पब्लिक पॉलिसी टूवर्ड्स इंडिया व्हिजन २०४७’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांची उपस्थिती राहणार आहे. व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे व पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी केले आहे.