पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘एक लाख वृक्ष लागवड’ उपक्रमाचा शुभारंभ

स्वातंत्र्यदिनी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या वर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून या उपक्रमाचा शुभारंभ देशाच्या स्वातंत्र्य दिनी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण करताना कुलगुरू प्रा प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा देवानंद चिलवंत व अन्य.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ विकास घुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Advertisement

ध्वजारोहणानंतर विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर व त्यांची टीम देखील उपस्थित होती. यावेळी विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वृक्षारोपण करण्यासाठी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे डॉ महेंद्र घागरे यांनी स्वीट महूगुणीचे 5000 व केशर आंब्याचे 2000 वृक्ष रोपे मोफत दिली आहेत. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर यांनी स्वीट महूगुणीचे दोन हजार रुपये दिली आहेत. मोहोळ येथील बोडके नर्सरीचे शिवाजी बोडके यांनी केशर आंब्याचे 151 रोपे मोफत दिली आहेत. त्याचबरोबर भारत विकास परिषदेचे महादेव न्हावकर यांनी 100 वनऔषधी रोपे तर विद्यापीठातील सहायक कुलसचिव आनंद पवार यांनी 55 स्वीट महगुणीचे रोपे विद्यापीठास मोफत दिली आहेत. याचबरोबर विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये 60 हजार बांबूचे रोपे तयार आहेत. करंज, पेरू, सिताफळ, लिंब, वड, पिंपळ, जांभूळ आदी फळांच्या वृक्षांची देखील लागवड विद्यापीठात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page