महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या फार्मास्युटीकल मेडिसिनच्या अभ्यासक्रमास प्रारंभ

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे नव्याने संरचित करण्यात आलेल्या एम एस्सी फार्मास्युटिकल मेडिसिन या अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरु डॉ निलिमा क्षीरसागर या दुरस्थ माध्यमाव्दारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, शैक्षणिक विभाग अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, डॉ स्वाती जाधव, महेंद्र कोठावदे, ब्रिग सुबोध मुळगुंद उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ निलिमा क्षीरसागर यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर फार्मास्युटिकल मेडिसिन या विषयाची व्याप्ती वाढत आहे. ‘मंकीपॉक्स’ सारखे नव्याने येणाÚया साथीच्या रोगांचे आव्हान जगभरातील सर्वच देशांना आहे. अश्या परिस्थितीत आरोग्य विद्यापीठाचा फार्मास्युटिकल मेडिसनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मोठया संध्या उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी संशोधनाबद्दल अधिक जागरुक राहून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमास नवे स्वरुप देण्यात आले असून प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्व समजावे व त्यांनी अधिक चौकस पध्दतीने कार्य करावे असे त्यांनी सांगितले. फार्मास्युटिकल मेडिसिनचा अभ्यासक्रम हा वेगळया स्वरुपाचा असून मळलेली वाट सोडून या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह अभिनंदनीय आहे. एकात्मिक शिक्षण पध्दतीचा वापर सर्वत्र मोठया प्रमाणात करण्यात येत असून आऊट ऑफ बॉक्स विचार करायला शिका तरच ज्ञानाची वृध्दी होईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की पुस्तकांमधून सर्व माहिती मिळते मात्र प्रात्यक्षिक ज्ञान हे खूप महत्वाचे असते. विद्यापीठामध्ये एन्क्युबेशन सेंटर, रिसर्च लॅब आहे त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण फार्मास्युटिकल अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील यांनी या अभ्यासक्रमाचे महत्व व भविष्यातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी डॉ विशाखा शहा, डॉ मयूर गिरी यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तावि डॉ स्वाती जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत शिवगुंडे यांनी तसेच डॉ वैभव आहेर यांनी आभार मानले केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील आधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page