गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० ऑगस्टपर्यंत

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) अभ्यास केंद्रातंर्गत विविध पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची अंतिम तारीख दि 30 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे.

IGNOU LOGO

प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाकरीता इग्नूच्या वेबसाईटवरुन तसेच लिंकवरुन अर्ज सादर करता येईल. अभ्यासक्रमाबाबत माहिती तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती इग्नूच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तरी, प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरुपात 31 ऑगस्टपर्यंत सादर करावे. प्रवेशासंबधी अधिक माहितीकरीता गोंडवाना विद्यापीठातील इग्नू अभ्यासकेंद्रात सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रत्यक्ष अथवा 8275399300 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इग्नू अभ्यास केंद्रांच्या समन्वयक डॉ प्रीती पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com