महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा छत्रपती संभाजीनगर येथे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रम संपन्न
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रम
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात उपक्रम – कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु असणाऱ्या उपक्रमांचे राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणियरीत्या वाढत असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषदचे सदस्य डॉ विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमुख डॉ अमित वांगीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, सेंटर ऑॅॅफ एक्सलेंसची विविध केंद्रे राज्यात सुरु करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नेत्ररोगाच्या विषयात केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. विद्यापीठातर्फे ऑनलाईन लायब्ररी सुरु करण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याणकारी विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा विद्यार्थ्यांचे मत, सूचना महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत त्यानुसार कार्यपध्दतीत बदल करणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी व समस्या येतात. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा याकरीता ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रम महत्वपूर्ण आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. विद्यार्थी व शिक्षकांच्या तक्रारी व सूचना समजून त्यांची दखल विद्यापीठाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरु यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला ’कुलगुरु का कट्टा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे विभागप्रमुख डॉ अमित वांगीकर यांनी सांगितले की, क्लिअर व्हिजन प्रोग्रॅम सामाजिकरीत्या असक्षम घटकांसाठी अंधत्व निवारण उपक्रम असून यामध्ये बाल अंधत्व, मोतीबिंदू, काचबिंदू, थायरॉईड, अंतर्नेपटल, बाहयनेत्रपटल, काळया बुभुळावरील टीका, दूरदृष्टीदोष, अ जीवनसत्व आभाव आदी नेत्रविकारांसोबत रेटिनोब्लास्टोमा हा लहान मुलांना डोळयांचा कर्करोग त्याचे निदान आणि अल्प दरात उपचार होणार आहेत, त्यासाठी घाटी महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांची मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी डॉ सुनिल फुगारे, महेंद्र कोठावदे, ब्रिग सुबोध मुळगुंद, घाटी महाविद्यालयाच्या नेत्रविभाग प्रमुख डॉ अर्चना वरे, डॉ कांचन देसरडा, विद्यापरीषद सदस्य डॉ अनुपमा पाथ्रीकर, उपविभागीय अभियंता एच के. ठाकुर, कार्यकारी अभियंता अनघा पुरणिक, संजय मराठे, संदीप राठोड, राजेंद्र शहाणे, बाळासाहेब पेंढारकर आदी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अविनाश सोनवणे, मानसी हिरे, अर्जुण नागलोत यांनी परिश्रम घेतले.