संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम संपन्न
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृहात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ वैशाली गुडधे, मानव विज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ मोना चिमोटे, वुमेन्स स्टडीज सेंटरच्या सह समन्वयक डॉ वैशाली धनविजय, आजीव अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांसह विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भगवान फाळके यांनी केले.