स्वारातीम विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि.०३ ऑगस्ट, रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, श्याम डाकोरे, अरुण इंगोले, बंडू कांबळे, रामदास खोकले, बबन हिंगे, मारोती कदम, बंकटसिंह ठाकूर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.