कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात महाकवी कालिदास दिनाचे आयोजन
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संस्कृत भाषा तथा साहित्य विभागातर्फे महाकवी कालिदास दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दि 6 जुलै रोजी करण्यात आले आहे. यामध्ये विशेष व्याख्यान, कालिदास वैखरी सरस सं संस्कृत प्रश्नावली आणि कालिदास स्मारकावर मेघदूतपाठ यांचा समावेश आहे.
महाकवी कालिदासाच्या साहित्यावर प्रख्यात हिंदी व संस्कृत चे साहित्यिक प्रो गिरीश्वर मिश्र, पूर्व कुलगुरू, महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय, वर्धा यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सारस्वत अतिथी या नात्याने प्रो महावीर अग्रवाल, मा श प्र-कुलगुरू, पतंजली विश्वविद्यालय, हरिद्वार उपस्थित राहतील. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय, संस्कृत भाषा साहित्य विभाग प्रमुख प्रो कविता होले, समन्वयक प्रो पराग जोशी हे विशेषत्वाने उपस्थित राहतील.