कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचा समारोप

विश्वविद्यालयाची संकल्पना ही बुद्धाने जगाला दिली – डॉ पंकज चांदे

बुद्ध विचारांचे वैश्विकरण व्हावे – कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज्, जम्मू यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद रामटेक येथे संपन्न झाली. या परिषदेचा समारोप सोमवार, दि 16 सप्टेंबर 2024 रोजी डॉ कमलाकर तोतडे सभागृह रामटेक येथे संपन्न झाला. या समारोप समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी या नात्याने कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे 24 व्या वार्षिक बुद्धिस्ट गरिषदेचे अध्यक्ष प्रो मुरली मनोहर पाठक, कुलगुरू, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली उपस्थित होते. विशेष अतिथी या नात्याने प्रो जी एस आर कृष्णमूर्ती, कुलगुरू, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपति, विशेष अतिथी या नात्याने डॉ रमेश प्रसाद, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसी, प्रो राम नारायण द्विवेदी, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी तसेच डॉ पुरणचंद्र मेश्राम, माजी कुलसचिव, नागपूर विद्यापीठ उपस्थित होते.

इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज् चे अध्यक्ष प्रो सत्यप्रकाश शर्मा, प्रो अरविंद जामखेडकर, कुलपती, जे जे स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई, प्रो वैद्यनाय लाभ, कुलगुरू, सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धिस्ट अॅट इंडिक म्टडीज, प्रो उदय बंद्र जैन, विश्वस्त, प्रो रखा बानू, निवृण प्रोफेसर, कलकता विद्यापीठ, इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज के उपाध्यक्ष प्रो ललितकुमार गुप्ता, सचिव प्रो सरस्वती मुत्सद्दी, कोषाध्यक्ष डॉ सुरेश कुमार, संयुक्त सचिव प्रो बंबानिका सूद नेकन तसेच विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डव आणि सदर परिषदेच स्थानिक सचिव प्रो प्रसाद गोखले विशेषत्वाने उपस्थित होते.

या परिषदेसाठी, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, दिल्ली तसेच केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्याद्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती तथागत गौतम बुद्ध यांना मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्दितींनी सरस्वती स्तन आणि शुध्द प्रार्थना सादर केली. प्रास्ताविक कुलसचिव कृष्णकुमार पागीय यानी केले. परिषेदेचे इतिवृत परिषद सचिव पो सरस्वती मुत्सद्दी यांनी मादर केल. तीन सहभागींनी परिपद अभिप्राय व्यक्त बार, मुव्यवस्थित परिषद आयोजनाची सर्वच प्रतिनिधींनी प्रशंसा की.

Advertisement

प्रमुख अतिथी प्रो वैचनाम त्रिपाठी यांचे अभिनंदन करून यांनी हि परिषद आयोजित व्यावद्दमा कुलगुरु प्रो हरेराम मानले. विश्वविद्यालयात आलेल्या परिषदेद्वारे बौद्ध दर्शन अध्ययनाच एक बौद्धिक मंच तयार झाला. बौद्ध दर्शनाचे ध्येय बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. विश्वकल्याण हाथ त्याचा उद्देश आहे. त्यावा प्रचार प्रसार व्हावा हाच या परिषदेबा उद्देश नाहे. डॉ पुरणचंद्र मेधाम म्हणाने, भारतात सपभूमी नाणि दीक्षाभूमी प्रसिद्ध बाहेत. नागपुरात येथे डॉ बाबासाहेब आबेडकरांनी पाच लाख लोकाना उम्म दीक्षा दिली तेथे या बौद्ध परिषदेचे आयोजन आणि ते ही कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने केले यात्रा मला आनंद वाटतो. या विश्वविद्यालयाने आता बौध्य अध्ययन केन्द्र गुरु बराने त्यासाठी आमच्या संस्थेचा पाठीचा राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रो रमेश प्रसाद आणि प्री राम नारायण द्विवेदी यांची समयोचित भाषणे ज्ञाती कुलगुरू पी जी, एग आर कृष्णमूर्ती, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपत्ती मंत्रोधित करताना म्हणाने, बौद्ध तत्त्वज्ञान हे संपूर्ण विधाला जोडणारे आहे. त्यांचा त्यचाद, माध्यमिकचारिका प्रमाणवातिक है संव किरणारे कोणीही मिळत नाही. त्यामुळे पाली भाषेचे अध्ययन करणे आणि बौड तत्वज्ञानाचा प्रसार-प्रचार भरणयच आहे. 24 च्या वार्षिक वृद्धिष्ट परिषदेचे अध्यक्ष व नाल बहादुर गाली संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो मुरली मनोहर पाठक यांनी कानिधाम संस्कृत विश्वविद्यानाच्या सुचान सुंदर आयोजनाची प्रशंसा केली. या त्रिदिवसीय बौद्धिक सत्रांमध्ये मी स्वतः सहभागी झालो आणि आजच्या नवीन पिडीचे अध्ययन पाहिले. आजची पिढी चिंतनात अग्रेसर आहे. अतिशय सूक्ष्मपणे विषयाचा वेध घेणारी आहे. ते पाहून आनंद झाला.

बुद्धाने दिलेली शिकवण ही जीवनासाठी मौल्यवान आहे. तिचे आचार-विचार या द्वारे आचरण करणे हीच खऱ्या अथनि बौद्ध तत्वज्ञान शिकल्याचे साफल्य आहे. इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीजचे अध्यक्ष एस पी शर्मा यांनी या परिषदेच्या उत्तम आयोजनासाठी कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांचे अभिनंदन करून आभार मानले, बुद्धाने सर्व उपदेश हे लोकभाषेत दिले. ते सर्वांपर्यंत पोचले पाहिजे, विश्वविद्यालयाने पाली बौद्ध अध्ययन केंद्र स्थापन करावे अशी विनंतीही त्यांनी कुलगुरू महोदयांना केली.

प्रमुख अतिथी डॉ पंकज चांदे म्हणाले, विश्वविद्यालयाची संकल्पना ही बुद्धाने जगाला दिली आहे. पूर्वी बौद्ध संघाचे विहार होते या विहारात विविध विषयांचे शिक्षक शिकवत असत. या विहारांची बृहत संकल्पना ही विश्वविद्यालयाद्वारे साकार झाली. नालंदा, तक्षशीला, गुणशीला, वलभी अशी अनेक विश्वविद्यालये प्रख्यात होती. कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने सर्व धर्म पुरोहित महिला संमेलन भरवले होते. त्यावेळेला बुद्ध धर्म हा सर्वात अधिक स्वातंत्र्य देणारा धर्म बसल्याचे अनुभवास आले. सध्या पाली भाषेत साहित्य निर्मिती होत नाही त्यासाठी पाली भाषेचे संभाषण वर्ग सुरु करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रो हरेराम त्रिपाठी यांनी बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केल्याचे सांगितले. धर्मात ज्या विकृती शिरल्या होत्या त्याचे निराकरण बुद्धांनी अतिशय सोपे आचार विचाराचे नियम सांगून आणि स्वतः आचरणात आणून केले. बुद्ध विचारांचे वैश्विकरण व्हावे आणि नवीन तथ्यांची मांडणी व प्राचीन सिद्धांताचे पुनरावलोकन व्हावे यासाठी ही परिषद दिशा देण्यात सफल झाली आहे हे आनंदाने सांगावेसे वाटते. प्रो त्रिपाठी यांनी या परिषदेच्या आयोजनाकरिता सर्व सहकारी संस्थांचे आभार मानले. कालिदास संस्कृत विश्वविद्यालायासाठी या परिषदेचे आयोजन करणे अत्यंत भूषणावह असून ही संधी दिल्याबद्दल इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज्, जम्मू चे आभार मानले.

या आयोजनासाठी विश्वविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मयोगी यांचे अहोरात्र सहकार्य लाभले त्याबद्दल कुलगुरू यांनी सर्वांना धन्यवाद दिले. परिषदेत सर्वोत्तम शोध पत्र संशोधक डॉ अर्कप्रभा चटर्जी याना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन आधुनिक भाषा विभाग प्रमुख प्रो पराग जोशी यांनी केले आणि आभार परिषदेचे स्थानिक सचिव प्रो प्रसाद गोखले यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page