उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि २० डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला.
प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे हे अध्यक्षस्थानीहोते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आयसर, पुणे येथील प्रा श्रीनिवास होथा यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भरत अमळकर उपस्थित होते. याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पवित्रा पाटील,प्राध्यापक सुरेखा पालवे,स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके, उपसमन्वयक डॉ. नवीन दंडी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्याच्यावतीने प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्राचार्य आर.आर.अहिरेयांनी तर सहभागींच्या वतीने हर्षवर्धन वाघ, याशिका पानसर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावरूनविद्यापीठ स्तरावरील संशोधन स्पर्धेसाठी ३६२ प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. १९ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत सादरीकरण केल्यानंतर त्यातील उत्तम प्रवेशिकांची अंतिम फेरीसाठी निवडकरण्यात आली. शुक्रवारी विद्यापीठाच्या विविध सहा प्रशाळांमध्ये या प्रवेशिकांचे सादरीकरण झाले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण प्रसंगी बोलतांना प्रा. श्रीनिवास होथा म्हणाले की, वेगवेगळ्या कल्पना शक्तिचा विचार करुन संशोधन करणे आवश्यक आहे. संशोधनाच्या माध्यमातून समस्या शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्वाचे असल्याचे प्रा. होथा यांनी सांगीतले. संशोधक विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
डॉ. भरत अमळकर म्हणाले की, संशोधन वृत्तीमुळे जीवनात निश्चितच अदभूत बदल होत असल्याने संशोधनाचा दर्जा उत्तम असावा. संशोधन करतांना ऑऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याची गरज आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी गुणवत्तापूर्वक आणि उत्तम संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. एस.टी. इंगळे यांनी अविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विजेत्या स्पर्धकांकडून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विचारशक्ती व कल्पना शक्तीचा संशोधनात विचार केला तर नक्कीच अविष्कार होतो, असेही ते म्हणाले. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार मानले. प्रा. पी.पी. पुराणिक यांनी स्पर्धेचे निकाल वाचन केले.
अविष्कार संशोधन स्पर्धेचा विविध गटांतील निकाल पुढील प्रमाणे:-
मानव्य विद्या, भाषा, आणि ललित कला शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : फातेमा मोहंम्मद व्होरा
(गजमल तुळशिराम पाटील, आर्ट,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, नंदुरबार )
पोस्टर द्वितीय : अस्मिता अरुण तेले आणि साक्षी कैलास बोरसे
(आर.सी.पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन,शिरपुर )
पोस्टर तृतीय : आयुष अनिल वळवी
(गजमल तुळशिराम पाटील, आर्ट,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, नंदुरबार )
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : पारस दिपक जैन, सागर शिवाजी काटे
( इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (आयएमआर), जळगाव)
पोस्टर द्वितीय : उर्मीला दत्तात्रय निकम, नफिस शेख
(आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर )
पोस्टर तृतीय : लिना संजय पाटील, प्राजक्ता सोमनाथ बिडवे,
(आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर )
पदव्युत्तर गट-(पीपीजी) :-पोस्टर प्रथम : योगेश रत्नाकर विसपुते, डॉ.एस.डी. शिंदखेडकर
(पुज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळ, एस.आय.पाटील, जी.बी.पटेल सायन्स
आणि एस.टी.के.व्ही. संघ कॉमर्स कॉलेज, शहादा,जि.नंदुरबार )
पोस्टर द्वितीय : निलेश रविंद्र कोळी,
(वसंतराव नाईक आर्टस, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, शहादा )
वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र व विधी शाखा
पदवी गट:- मॉडेल प्रथम : अमन संजय चिरनिया, सिध्दकेश तरडे
(आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर )
पोस्टर द्वितीय : सौरभ सुनिल माळी
( इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (आयएमआर), जळगाव )
पोस्टर तृतीय : अश्विनी कन्हैया पाटील
(आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट,शिरपुर )
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : कल्याणी गोपीचंद पाटील, देवयानी रमेश माळी
(बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स ॲण्ड के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चालीसगांव)
पोस्टर द्वितीय : वैष्णवी नरेंद्र सुर्यवंशी, श्वेता विशाल तायडे,
(कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट,जळगाव )
पोस्टर तृतीय : गायत्री सुनिल चौधरी, प्रज्ञा सुभाष चौधरी
(कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट, जळगाव )
पदव्युत्तर-(पीपीजी):- पोस्टर प्रथम : कौस्तुभ किशोरकुमार सावंत (स्कुल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, )
पोस्टर द्वितीय : देवदत्त गोखले
(जी.एच.रयसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट, जळगाव)
विज्ञान शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : रितेश सुनिल पाटील (आर.सी.पटेल ऑर्ट, कॉमर्स, ॲण्ड सायन्स कॉलेज, शिरपुर )
पोस्टर द्वितीय : राजकुमार एन. शिरनामे, कु.प्रियंका एन.जाधव
(एच.आर.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल ॲण्ड एज्युकेशन ॲण्ड, रिसर्च )
मॉडेल तृतीय : मकरंद रविंद्र पाटील, मयुर खुशाल सुर्यवंशी
(श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित आर्टस,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज,बांभोरी,जळगाव)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : संकेत अनिल निकुंभ्, सौरभ शरद अमृतकर
(आर.सी.पटेल कॉलेज ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर )
पोस्टर द्वितीय : उमेद किशोर लोखंडे, गजेंद्र आनंदा शिरतुरे (धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुर)
पोस्टर तृतीय : एैश्वर्या व्ही.जैन, वैशाली व्ही राठोड
( स्कुल ऑफ केमिकल्स सायन्स,कबचौउमवी,जळगाव )
पदव्युत्तर–(पीपीजी):- पोस्टर प्रथम : श्वेता फेगडे (डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय,जळगाव )
मॉडेल द्वितीय : उझमा नाझ शेख ईक्बाल
(एम.जे.कॉलेज,जळगाव, (स्वायत्त संस्था सलग्नता कबचौउमवि,जळगाव )
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानशाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : हर्षदा ईश्वर पाटील, राहुल सुकदेव जाधव
(एच.आर.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल ॲण्ड एज्युकेशन ॲण्ड, रिसर्च )
पोस्टर द्वितीय : श्रृती जी.चौधरी, प्रियांशु के. लढे
(एच.आर.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल ॲण्ड एज्युकेशन ॲण्ड, रिसर्च )
पोस्टर तृतीय : हर्षदा पांडुरंग पाचपांडे, गायत्री दत्तात्रय पाटील
(कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलाजी,बांभोरी)
पदव्युत्तर गट :- मॉडेल प्रथम : राजेश्वरी हेमंत मालोदे, कोमल कृष्णा डोरे
(आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : नितीन किशोर मोरे
( एच.आर.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च )
मॉडेल तृतीय : किरण छगन भिल्ल, संदिप शिवराम पवार
(स्कुल ऑफ सोशल सायन्स,कबचौउमवि,जळगाव )
पदव्युत्तर–(पीपीजी):- पोस्टर प्रथम : पाटील कोमल सुधाकर
(युनिर्वसिटी इन्स्टीट्युट ऑफ केमीकल टेक्नॉलाजी,कबचौउमवि,जळगाव )
पोस्टर द्वितीय : नवनित केशव पाटील
(युनिर्वसिटी इन्स्टीट्युट ऑफ केमीकल टेक्नॉलाजी,कबचौउमवि,जळगाव)
औषधनिर्माण व वैद्यकीय शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : दिपाली जिजाबराव महाजन, दामिनी आधार पाटील
(श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,चोपडा)
पोस्टर द्वितीय : पल्लवी हरिश्चंद्र निकम,वैष्णवी रविंद्र पाटील
(आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी,शिरपुर)
पोस्टर तृतीय : परमेश्वर दरोगा यादव, प्रणव विवेक पाटील
(आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी,शिरपुर)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : संकृती रविंद्र सरकार, तेजल अशोक अटारे
(आर.सी.पटेल इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : प्रणाली अनिल पगार, अर्चना नथ्थु वाडीले
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर तृतीय : मोहिनी संजय तायडे
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पदव्युत्तर –(पीपीजी) :- पोस्टर प्रथम : सुमित सिताराम राठोड
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : गौरव श्रीराम पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
कृषी व पशुसंवर्धन शाखा
पदवी गट :- पोस्टर प्रथम : दिपवर्धन पी. चौधरी, तेजस एस. पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय: सानिका प्रमोद माळी, वसुधा साहेबराव पाटील
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर तृतीय : अक्षय नंदु काकडे, हर्षा दिनकर कुरकुरे
(एम.जे.कॉलेज, जळगाव स्वायत्त संस्था संलग्न कबचौउमवि,जळगाव)
पदव्युत्तर गट :- पोस्टर प्रथम : हर्षदा राजेंद्र गव्हाले
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर द्वितीय : लिना जी. शिंपी, दिक्षीता एम. जैन
(आर.सी.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)
पोस्टर तृतीय : प्रतिक्षा शांतीलाल पाटील, निकीता भानूदास सोनवणे
(आर.सी.पटेल, आर्ट,कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज,शिरपुर)
पदव्युत्तर –(पीपीजी):- मॉडेल प्रथम : देवश्री सुनिल सोनवणे
(एम.जे.कॉलेज, जळगाव स्वायत्त संस्था संलग्न कबचौउमवि,जळगाव)
पोस्टर द्वितीय : गिरीष दशरथ चाटे
(स्कुल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, कबचौउमवि,जळगाव )
शिक्षकेत्तर गट :- प्रथम : निंबाजीराव विनायकराव पाटील , (कबचौउमवि,जळगाव)
द्वितीय : संजय दयाराम बागल, सोनल सचिन सराफ,
(एच.आर.पटेल फार्मासिटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,शिरपुर)