उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राज्यस्तरीय साहसी शिबिराचा चिखलदरा येथे समारोप
जळगाव : अमरावती जिल्हयाच्या चिखलदरा येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय साहसी शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गोपाळ पाटील या स्वयंसेवकाला आदर्श स्वयंसेवक साहसी क्रीडा राज्यस्तरीय शिबिरार्थी पुरस्कार प्राप्त झाला.
चिखलदरा येथे झालेल्या साहसी शिबिराचा ३१ मार्च रोजी समारोप झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सात स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामध्ये गोपाळ पाटील याला आदर्श स्वयंसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. तो विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेचा विद्यार्थी आहे. विद्यापीठाच्या संघासोबत संघ प्रमुख म्हणून डॉ दिनेश देवरे होते. या पुरस्काराबद्दल कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील आणि रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी गोपाळ पाटील याचे अभिनंदन केले.