कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. एस. डब्ल्यु. प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २७ जुलै रोजी

जळगाव दि. १७ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित समाजकार्य महाविद्यालय आणि विद्यापीठातील समाजकार्य विभाग येथील एम. एस. डब्ल्यु. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. ३० जुलै रोजी होणारी सामाईक प्रवेश प्रक्रिया आता दि. २७ जुलै रोजी होणार आहे.

        शासनाचे विद्यापीठ व महाविद्यालयातील वर्ग त्वरीत सुरू करण्याचे आदेश असल्यामूळे एम. एस. डब्ल्यु. ची सामाईक प्रवेश परीक्षा दि. २७ जुलै रोजी घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जुलै आहे. दि. २३ जुलै रोजी अर्ज स्विकृती केंद्रावर ऑनलाईन फी भरल्याची पावती आणि शैक्षणिक कागदपत्रे जमा करावयाचे आहेत. त्याच दिवशी प्रवेशाला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी जाहीर होईल. दि. २४ जुलै रोजी लेखी स्वरूपात सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत हरकती मागविल्या आहेत. दि. २५ जुलै रोजी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट मिळतील. दि. २७ जुलैला लेखी परीक्षा होणार असून दि. ३० जुलैला निकाल व महाविद्यालयांची यादी जाहीर होईल. दि. ३१ जुलैला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घ्यावे. अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवेश पात्रता विभागाकडून देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com