श्री शिवाजी महाविद्यालयात साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन उत्साहात संपन्न
परभणी : श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या व साहित्य अकादमीने दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सायं ०५:०० वाजता श्री शिवाजी सभागृह २ मध्ये काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशकट्टी तर प्रमुख कवी केशव बा वसेकर, इंद्रजीत भालेराव, तुकाराम खिल्लारे, रेणू पाचपोर व अरविंद सगर यांची होती.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रसिद्ध कथाकार तथा साहित्य अकादमी सामान्य परिषद सदस्य डॉ आसाराम लोमटे, मराठी विभाग प्रमुख डॉ प्रल्हाद भोपे यांची होती. स्वागत पर प्रास्ताविक आसाराम लोमटे यांनी केले त्यांनी त्यामध्ये साहित्य अकादमीची भूमिका, साहित्य अकादमीचे विविध कार्यक्रम आणि साहित्य अकादमीचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश व्यक्त केला. सर्व कवींनी वास्तव जीवनावर भाष्य करणाऱ्या अस्सल ग्रामीण भाषेमध्ये विविध विषयावरील कविता सादर केल्या. बरे झाले देवा, गाव, ढाबा संस्कृती, सहा हायकू, तांता, गझल आदी रचना कवींनी सादर केल्या.
या काव्य वाचनाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी यांनी केला. त्यांनी परभणी जिल्ह्याचा सांस्कृतिक, साहित्यिक वारसा सांगून नवोदित साहित्यिक आणि कवी यांनी लिहीत झालं पाहिजे हा वारसा पुढील पिढीकडे सोपवला पाहिजे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, परभणी शहरातील मराठी भाषा व साहित्य याविषयी आवड असणारे शिक्षक, प्राध्यापक, सुजाण नागरिक, साहित्यिक श्रोते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख प्रा प्रल्हाद भोपे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिल बडगुजर यांनी केले.