कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा बारावा दीक्षांत समारंभ बुधवारी

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा द्वादश दीक्षांत समारंभ बुधवार, दि. 6 मार्च 2024 रोजी दुपारी 03:00 वाजता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे आयोजित केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस हे दीक्षांत समारोहाचे अध्यक्षस्थान भूषवतील. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणा-या या समारोहाचे प्रमुख अतिथी या नात्याने चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, व विशिष्ट अतिथी म्हणून प्रो प्रल्हाद जोशी, कुलगुरू, कुमार भास्कर वर्मा संस्कृत व पुरातनाध्ययन विश्वविद्यालय, नालबारी, आसाम विशेषत्वाने उपस्थित राहतील. विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, व्यवस्थापन परिषद, विद्वत् परिषदेचे सदस्य, सर्व संकायांचे अधिष्ठाता आणि पदकदान-दाते याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित राहतील.

या दीक्षांत समारोहात 2021-22 व 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी या दीक्षांत समारोहात 2551 पदव्युत्तर पदवी, 5356 पदवी, 1992 पदविका, 236 पदव्युत्तर पदविका, व 226 प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायपीठम् द्वारा 207 पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अशी एकूण 10583 पदवी प्रमाणपत्रे प्रदान करतील. एकूण 87 सुवर्ण पदकांसह 25 रोख पारितोषिके देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच याप्रसंगी 1 संशोधनपर विद्यावाचस्पती (डी.लिट) तसेच 14 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत विद्यावारिधी (पीएच. डी.) पदवीने गौरवान्वित करण्यात येईल.

द्वादश दीक्षांत वैशिष्टये –

संशोधनपर D.Litt. – विद्यावाचस्पती डी. लिट्. उपाधी 1 संशोधकाला प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. अनोमा साखरे यांना “Study Of Buddhist Iconography And Temple Architecture As An Illustrating Expression Of Buddhism In Its Proliferation In Theravadin Buddhist Countries” या संशोधनाकरिता विद्यावाचस्पती अर्थात् डी. लिट्. उपाधीने सन्मानित करण्यात येणार आहे.

सर्वाधिक पदके 7 सुवर्ण पदके तसेच 1 रोख पारितोषिक एम.ए. आचार्य (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल तसेच आणि सर्व विद्याशाखांमधून सर्वप्रथम आल्याबददल श्रुती अजय शर्मा (2021-22). राधा मुकंद देशकर (2022-23) या विद्यार्थिनीला सर्वाधिक पदके 7 सुवर्ण पदके तसेच 1 रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

राज्यपाल यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणारे मा. कुलपती सुवर्णपदक मा. राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती यांच्याद्वारे देण्यात येणारे कुलपती सुवर्णपदक आचार्य (एम्. ए). (दर्शन) मध्ये सर्वाधिक गुण अर्थात् प्रथम कमांक प्राप्त केलेल्या कु. आकांक्षा सुनील पांडे (21-22) कु. श्रुतिका संतोष बडगे (22-23) यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय आणखी चार सुवर्णपदकेही आकांक्षा व श्रुतिका यांना प्रदान करण्यात येतील.

सर्वोत्तम अष्टपैलू विद्यार्थी सुवर्णपदक विश्वविद्यालयाच्या रामटेक, वारंगा व रत्नागिरी या परिसरातून सर्वस्तरीय सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणा-या विद्यार्थ्याला देण्यात येणारे श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ स्मृती सुवर्णपदक 2021-22 व 2022-23 करिता अनुक्रमे सिमरन ठाकूर आणि हर्षल बांगडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सर्वोत्तम प्रबंधाचे पारितोषिक –

प्रत्येक संकायातील सर्वोत्कृष्ट प्रबंधाला देण्यात येणार आहे.

Advertisement
  • 1 सौरभ नंदकिशोर जोशी यांना वेदविद्या संकाया अंतर्गत डॉ. जयवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या “प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीनां संस्कतकृतिषु वैदिकधर्मस्य वैदिकसंस्कृतेश्च प्रभावस्य विवेचनात्मकमध्ययनम्” या विषयावरील प्रबंधासाठी
  • 2 राजीवरंजन देवेंद्रनाथ मिश्रा यांना संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकाया अंतर्गत प्रो. कविता होले यांच्या मार्गदर्शनाखाली “ICT Adaption in Sanskrit Higher Education in India – A Study” या विषयावरील प्रबंधासाठी
  • 3 गौरव देविदास कडलग यांना भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकाया अंतर्गत प्रो. मधुसूदन पेन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली “Critical Edition of Yogacintamani of Sivananda Saraswati with Critical Study and Critical Notes” या विषयावरील प्रबंधासाठी आणि
  • 4 नीलिमा भाऊराव रिंधे यांना शिक्षणशास्त्र तथा संकीर्ण विद्याशाखा संकाया अंतर्गत डॉ. हृषिकेश दलाई यांच्या मार्गदर्शनाखाली “Effectiveness Of Brain- Based Learning Program On Achievement In Mathematics And Attitude Towards Mathematics Of Secondary School Students” या विषयावरील प्रबंधासाठी
  • 5 प्रणव प्रदीपराव मुळे यांना प्राचीन भारतीय विज्ञान तथा मानव्यशास्त्रे संकायाअंतर्गत प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली “भारतीय प्रस्तर वेधयन्त्रों का अध्ययन” या विषयावरील प्रबंधासाठी
  • या विषयांवर सादर केलेल्या सर्वोत्तम 5 प्रबंधांना सुवर्णपदक देण्यात येणार आहे.

प्रथम स्थान प्राप्त गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे

  • सर्वेश गणेश जोशी (22-23) या विद्यार्थ्याला एम्.ए. (वेद) (गुरुकुलम्) मध्ये, वैदेही मनोज गायकी (21-22) व तृप्ती विजय काशीकर (22-23) (व्याकरण) (गुरुकुलम्) मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल तसेच 2021-22 व 2022-23 करिता अनुकमे एम्.ए. (योगशास्त्रामध्ये) अनिता अँथोनी आल्वा, मनोजा देवदत्त पाटील, एम्.पी. ए. (नृत्यशास्त्रामध्ये) मृणालिनी दिनेश शाह, उष्मी अमित दोशी, एम्.ए संस्कृत (बहुशाखीय मध्ये) दीपाली अशोक पांडे, सिद्धी अभय वैद्य, एम्.एस्सी. (योगिक सायन्स मध्ये) आंचल योगेश भोजवानी, अंजली संजय दत्ता, एम्.ए. (ज्योतिर्विज्ञान मध्ये ) दिपाली आनंद देशपांडे, चित्रा नीलेश पाटकर, एम्.ए (ज्योतिष मध्ये) कौशल गिरीश जोशी या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम आल्याबद्दल पदक व पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
  • (सत्र 2021-22 व 2022-23 ची नावे अनुकमे) बी.ए. (विशारद) मध्ये संतोष दुर्गादास गोसावी, बी.ए. (योगशास्त्र) मध्ये दीपशिखा, अरुणकुमार अंकीत बी.ए. (कीर्तनशास्त्र) मध्ये रूपाली विजयकुमार घैसास, श्रीराम अशोक काटकर, बी. ए. (नृत्यशास्त्र) मध्ये श्रीकांत कृष्णराव धबडगावकर, वैष्णवी रघुनाथ जोशी, बी.एफ्.ए. (उपयोजित कला) मध्ये मुस्कान दीपक गोजे, सिद्धान्त सुनील मालुसरे, बी. ए. (वेदांग ज्योतिष) मध्ये आशाज्वाला रमेश नाईक, उमेश बालाजीराव पाध्ये, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) मध्ये अलिशा भोला खोब्रागडे, तेजस्विनी गिरीश तळपल्लीकर, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) (मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम) सुनियोजित सुधीर रामटेके, बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज्) मध्ये प्रसनजित प्राणकिशन पाल यांना पदके व पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
  • सत्र 2021-22 व 2022-23 करिता अनुकमे करिता बी. एड्. शिक्षाशास्त्री पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल हर्षल उद्धवकुमार तडस व किसन रामदास पाटील तसेच मुलींमधून प्रथम कमांक प्राप्त केल्याबददल पल्लवी बळवंत ठाकरे व स्वाती प्रकाश नास्कोलवार आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम कमांक प्राप्त केल्याबददल मयुरी देवानंद टेंभुर्णे व पल्लवी अनिल कोटकर यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल.
  • एम्.एड्. शिक्षाशास्त्री पारंगत पदव्युत्तर पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल प्रिया सुनील बुरंगे, श्रुतिका ज्ञानेश्वर बावनकर यांना अनुकमे 21-22 व 22-23 करिता सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
  • मुक्तस्वाध्यायपीठम् Open & Distance Learning Centre द्वारे परिचालित एम्.ए. (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त पल्लवी सुरेश शेळके आणि एम्.ए. (योगशास्त्र) परीक्षेत वनिता मारुती मगदूम यांना 2021-22 करिता कुलगुरू पदक प्रदान करण्यात येणार आहे.

संस्कृत, योग, योगविज्ञान, वास्तु, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, आतिथ्यसेवा (Hospitality Studies), शिक्षण, संगणक उपयोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला इ. ललित कला इ. 35 हून अधिक विविध विषयांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी आणि पदके प्रदान करण्यात येतील.

पत्रकार परिषदेला विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी संबोधित केले. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, वित्त व लेखा अधिकारी प्रो. कविता होले, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव श्री श्रीपाद अभ्यंकर व जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page