कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात योगभारती कार्यक्रम संपन्न
रामटेक : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय दर्शन विभाग व योगविभागाद्वारे, योगभारती कार्यक्रमा अंतर्गत दि 03.02.2025 या दिवशी “भस्त्रिका प्राणायामः” उद्देश्यं प्रस्तूतयश्च हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो हरेराम त्रिपाठी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता संसाधन व्यक्ती म्हणून सुनिल भुजबळ हे उपस्थित होते. सुनिल भुजबळ हे विश्वविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून भस्त्रिका प्राणायामाच्या अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे. त्यांनी भस्त्रिका प्राणायामाच्या प्रात्यक्षिकाद्वारे 20 मिनिटांत 5,057 वेळा भस्त्रिका प्राणायाम करुन विश्वविक्रम नोंदविला आहे. यावेळी त्यांचे योगप्रात्यक्षिकाद्वारे श्रोत्यांना मार्गदर्शन लाभले.





सुनिल भुजबळ यांनी भस्त्रिका प्राणायामाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले. या कार्यक्रमात सुनिल भुजबळ यांना विश्वविद्यालयाद्वारे अभिनन्दनपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ हे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ दिलीप पाटील भुजबळ यांचे देखील श्रोत्यांना विशेषतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी रामटेकचे पोलीस उप अधीक्षक रमेश बरकते हे पोलीस विभागाच्या इतर अधिकारी व जवानांसह या कार्यक्रमास उपस्थित होते. पोलिसांचे वेळोवेळी विश्वविद्यालयास सहकार्य लाभत असते. त्यामुळे रामटेक पोलिस विभागाचा प्रमाणपत्र देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला. रामटेकचे पोलिस निरीक्षक आसाराम शेटे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “हठयोगप्रदीपिका ची परंपरा आदिनाथांपासून प्रारंभ झाली. आसन आणि भस्रिका इ प्राणायामा द्वारे सर्वांना स्वस्थलाभ करून देणे आणि योगाद्वारे राजयोग प्राप्ती (समाधी लाभ) करवून देणे हेच त्यांचे लक्ष्य होते. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन चंद्रपाल चौकसे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ देवानंद शुक्ल हे उपस्थित होते.
भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती संकायाच्या अधिष्ठाता प्रो कलापिनी अगस्ती यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयन, योग विज्ञान व समग्र स्वास्थ्य विभागाचे विभागप्रमुख डॉ सचिन द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाचे सहसमन्वयन व सूत्रसंचालन भारतीय दर्शन विभागाचे सहायक प्राध्यापक सचिन डावरे यांनी केले. योग विज्ञान विभागाचे अधिव्याख्याता दिवाकर शर्मा यांनी सहसमन्वयक म्हणुन कार्य पाहिले. या कार्यक्रमासाठी भारतीय दर्शन विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ पूजा सिंह, योग विज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक अतुल गाळेराव आणि अधिव्याख्याता सुजाता द्रव्यकार यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमास दोन्ही विभागाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी देखील सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी श्रोत्यांमध्ये विश्वविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी व जवान तसेच नागरिकही उपस्थित होते.