कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत ५ विद्यार्थ्यांची निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष व स्कूल ऑफ कॉम्युटर सायन्सेस अंतर्गत एमसीए/एमएस्सी (कॉम्प्युटर व आयटी) ह्या विद्यार्थ्यांसाठी आरबीआयएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे या कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीत ५ विद्यार्थ्यांची निवड झाली.
कंपनीतर्फे मुलाखत घेण्यासाठी एचआर मॅनेजर मिनल पाटील व टेक्नीकल हेड इमाम सय्यद हे उपस्थित होते. स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस येथील १०५ विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली होती. त्यातील २३ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यात जगदीश पाटील, हिमांशु निकुंभ, रोहीनी पाटील, मृणालिनी सिंग व सुरुची पाटील यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. मुलाखतीचे व्यवस्थापन प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा व प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ. संदीप भामरे यांनी केले. या विद्यार्थ्यांचे कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्र्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा.राकेश रामटेके, कक्षाचे समन्वयक प्रा.रमेश सरदार व उपसमन्वयक डॉ.उज्वल पाटील यांनी अभिनंदन केले.