कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात G-20 युवा संवाद- भारत @2047 या संमेलन संपन्न
जळगाव दि. २२ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या G-20 युवा संवाद- भारत @2047 या संमेलनात अमृतकाळातील पंचप्रण या मुख्य विषयाच्या अनुषंगाने झालेल्या सादरीकरणात जळगावच्या जी.एच. रासयोनी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक पाटील याने प्रथम तर एच.जे. थिम महाविद्यालय , जळगावच्या साबा चौधरी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. G-20 युवा संवाद- भारत @2047 या संमेलनाचा शनिवारी सायंकाळी जल्लोषात समारोप झाला. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, केशव स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, अॅङ अमोल पाटील, संचालक डॉ. जे.डी. लेकुरवाळे हे उपस्थित होते.
आपल्या भाषणात प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी तरूण पिढी संवेदनशील असून समाजातील विषयांकडे गांभिर्याने बघते आहे. बदल, प्रगती आणि कल्पकता यांची सांगड घालून जात, धर्म, प्रांत या पलिकडे जाऊन उत्तम माणूस व्हा असा सल्ला त्यांनी दिला. भरत अमळकर यांनी देशाचे चारित्र्य घडविण्यात तरूणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी या संमेलनाचा आढावा घेतला. परीक्षक प्रा. सर्जेराव जिगे, प्रा. उमेश मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश पाटील व नेहा जोशी यांनी केले. समन्वयक अॅड. अमोल पाटील यांनी आभार मानले. यावेळी अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, डॉ. मंदा गावीत, अमोल मराठे, सुनील निकम, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, दिनेश खरात, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, केदारनाथ केवडीवाले, अॅङ केतन ढाके, दीपक पाटील, सुरेखा पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम तसेच रा.से.यो. समन्वयक डॉ. मनीष करंजे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
सादरीकरणाचा निकाल या प्रमाणे – प्रथम – विवेक पाटील (जी.एच. रासयोनी महाविद्यालय, जळगाव),द्वितीय – साबा चौधरी (एच.जे. थिम महाविद्यालय, जळगाव), तृतीय – चेतना निकुंभ (कर्म. अ.मा.पाटील महाविद्यालय, पिंपळनेर), चतुर्थ – गौरव पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), पाचवा – अपुर्वा शहा (पीएसजीव्हीपीएसचे महाविद्यालय, शहादा)