एमजीएम विद्यापीठातर्फे शनिवार, रविवारी कलायडोस्कोप मॉडेल हंटचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर :  महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनतर्फे शनिवार, दि ११ मे व रविवार, दि १२ मे रोजी विद्यार्थीनींसाठी कलायडोस्कोपसाठी फॅशन शो मॉडेल हंट – ऑडीशन घेण्यात येणार आहे.

MGM GATE

प्रोझोन मॉलमधील पहिल्या मजल्यावर एमजीएम विद्यापीठाच्या स्टुडीओमध्ये ही ऑडीशन घेण्यात येईल. उमेदवारांसाठी ही चाचणी असून इच्छूक उमेदवारांनी शनिवारी दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत या चाचणीसाठी उपस्थित राहावे. रविवारी दुपारी एक ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान या चाचणीमध्ये इच्छूक विद्यार्थीनींना सहभागी होता येईल, असे एलएसओडी कलायडोस्कोप फॅशन शोच्या संयोजकांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com