राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व प्रशिक्षण कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त आयोजन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृह येथे गुरुवार, दि ५ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत २४० पेक्षा अधिक जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय, पदविका इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, RTMNU Nagpur

रोजगार मेळाव्यामध्ये ॲक्सिस बँक, इंडोरामा, टाटा तनिष्क, लाईट हाऊस सिस्टीम, निको अलाॅय, करण कोठारी ज्वेलर्स, स्मार्ट हायजीया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट नागपूर, मंशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, टाटा स्ट्राईव्ह एक्सटेन्शन सेंटर वाडी नागपूर, ईराॅस मेटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, महाचाय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, एलआयसी ऑफ इंडिया, टाइम प्रो इव्हेंट अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ राजू हिवसे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com