जे जे परिचर्या महाविद्यालयातर्फे पडघा येथे मासिक पाळीविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

मुंबई : नवरात्री पर्वाचे औचित्य साधत परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पडघा येथील आश्रम शाळेत मासिक पाळी मध्ये कशी काळजी घ्यायची याविषयी पथनाट्याद्वारे, प्रात्यक्षिकेदाखून जनजागृती केली. या कार्यक्रमात कुलकर्णी सर यांनी मासिक पाळी विषयी सविस्तर माहिती सांगितली.

यावेळी नीता धुरी यांनी सॅनिटरी पॅड कसा वापरायचा हे प्रात्यक्षिकातून दाखवले. फिफ्थ सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मासिक पाळी विषयी माहिती दिली, तसेच योगा प्रात्यक्षिके दाखवली. परिचर्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले गेले.

मासिक पाळी अभियान करत असताना जे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे, प्राचार्या डॉ अपर्णा संखे, विद्यार्थी समन्वयक हेमलता गजबे, नीता धुरी, विश्राम कुलकर्णी तसेच आश्रम शाळेतील प्राचार्य पाटील मॅडम समाजसेवक केकाण सर व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com