‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी डी पवार आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील यांनी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

यावेळी डॉ एस एन कबाडे, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, संभा कांबळे, रामदास खोकले, शिवप्रसाद काकडे व विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनीही जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page