लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवनसाधना पुरस्कार जाहीर

६६ व्या वर्धापनदिनी होणार पुरस्कार वितरण

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार प्रख्यात लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.

Advertisement

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना २३ ऑगस्ट १९५८ रोजी करण्यात आली. या निमित्ताने दरवर्षी जीवन साधना पुरस्कार देण्यात येतो. विद्यापीठाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीने जीवन साधना पुरस्कारासाठी प्रख्यात लोककलावंत, ढोलकीसम्राट पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांची शिफारस केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते येत्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता ६६ व्या वर्धापनदिनी पुरस्कार वितरण करण्यात येईल. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी सकाळी ०९:०० वाजता मुख्य इमारतींसमोरील हिरवळीवर विद्यापीठाचा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page