शेतकरी आत्महत्येमागील मानसशास्त्रीय दृष्टिकोन तपासणे गरजेचे – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठात ‘पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय’ यावर तज्ज्ञांचे चर्चासत्र


अमरावती (दि.23.05.2025) : पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पश्चिम विदर्भात असलेल्या समस्यां ंआणि कर्नाटक राज्यातील समस्यां सारख्याच आहेत, मात्र तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्येमागील मानसशास्त्रीय दृष्टिकोन तपासणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय’ या विषयावर संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती विभागातील तज्ज्ञ अभ्यासकांची मते जाणून घेण्यासाठी व सदर विषयावर चर्चा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय यावर चर्चासत्रावेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष, प्रसिध्द अर्थतज्ज्ञ तथा अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, वसंतराव नाईक मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे उपस्थित होते.

Advertisement


डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, कर्ज किंवा कर्जमाफी ही शेतकरी आत्महत्येवर उपाययोजना होणार नाही. शेतक-यांची कर्ज परतफेडीची क्षमता वाढली पाहिजे. कृषी क्षेत्रात जोडधंदे चालायला पाहिजे. कपाशीची जागा सोयाबीनने घेतली. नॅशनल सॅम्पल सव्र्हेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अन्य राज्यांच्या तुलनेने मागे आहे. शेतमजुरीचा दर वाढला पाहिजे. उत्पन्नातील विषमता संपली पाहिजे. कृषी क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते, मात्र त्या प्रमाणात पुरुषांचे प्रमाण कमी असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठ गीताने चर्चासत्राची सुरुवात झाली. प्रास्ताविकेमधून चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख अर्थनियमन केंद्राचे समन्वयक तथा संशोधन प्रकल्पाचे सचिव डॉ. महेंद्र मेटे यांनी मांडली. संचालन डॉ. प्रशांत हरमकर यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर व्ही. एम. मेटकर तसेच अमरावती विभागातील शेतकरी चळवळीतील तज्ज्ञ मंडळी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *