अमरावती विद्यापीठात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम ए योगशास्त्र व योग थेरपी अभ्यासक्रमाच्यावतीने 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून, 2024 रोजी सकाळी 06:30 वाजता विद्यापीठातील शारीरिक शिक्षण व रंजन विभागाच्या मैदानावर योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
योग ही भारतातील हजारो वर्षाची जुनी परंपरा असून शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक प्रयत्नांना जोडते. योग हा व्यायाम नाही, तर एकरुपतेची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे. योगामध्ये लक्ष, संयम, शिस्त आणि चिकाटी या गुणांवर जोर देण्यात आला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी योग सर्वांगीण विकासाकरिता महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विद्यापीठात एम ए योगशास्त्र योग थेरपी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले व अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद सुध्दा आहे.
अभ्यासक्रमातूनच विद्यार्थी आरोग्यवर्धिनी, केंद्रीय विद्यालय, पोलीस विभाग, विविध रुग्णालय, शाळा, महाविद्यालये तसेच स्वयंरोजगारासाठी योग वर्ग घेण्यासाठी तज्ज्ञ योगशिक्षक म्हणून तयार होत आहेत. योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यादृष्टीने कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांची प्रेरणा व विभागाचे संचालक, डॉ श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित योग दिन कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी केले आहे. अधिक माहिती करीता प्रा शुभांगी रवाळे 7972324188, प्रा स्वप्निल मोरे 7588084481, प्रा अनघा देशमुख 8087339683, प्रा स्वप्निल ईखार 7378865049 यांना संपर्क साधता येईल.