एमजीएम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या योग विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित योग उत्सव कार्यक्रम विद्यापीठाच्या चिंतनगाह येथे सकाळी ०६:०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात आयुष्य मंत्रालय, भारत सरकार द्वारा सूचित पूरक हालचाली, योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव योगशिक्षक गंगाप्रसाद खरात यांनी करून घेतला. यावेळी कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे दिलेल्या मार्गदर्शन सुचनानुसार एक तासांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये सूक्ष्म आसणे, योगासने, ध्यान, प्राणायाम आदींचा समावेश होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस या वर्षीसुद्धा योग विज्ञान, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, एमजीएम विद्यापीठ व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष विभागांतर्गत यावर्षीची संकल्पना ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ असून स्वतः सोबत समाज देखील निरोगी राहण्यास मदत होते. हा या वर्षीच्या संकल्पनेचा उद्देश आहे.