मिल्लीया महाविद्यालयात आंतर राष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या जेंडर सेन्सीटायझेशन सेलने दिनांक 08 मार्च 2024 शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. जेंडर सेन्सीटायझेशन सेलच्या अध्यक्षा तथा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रो डॉ. सीमा हाश्मी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते बीड मधील गरीब महिलांना फळे व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर एस. एस. हुसैनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.