महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात साईच्या सहकार्याने “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ५ मार्च २०२६ ते ९ मार्च २०२५ दरम्यान “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. साई (Sports Authority of India ) म्हणजेच भारतीय खेळ प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची शान असलेल्या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला वेगळं महत्त्व मिळालं. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू, मा. प्राध्यापक (डॉ.) बिंदु एस. रोनॉल्ड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचीव मा. प्राध्यापक (डॉ.) धनाजी एम. जाधव, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमात अतिथी वक्ते म्हणून उपस्थित होते, डॉ. अर्पिता सक्सेना (योगा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), श्रीमती लता पी. कलवार (प्रशिक्षक, महिला स्वबचाव विभाग, देवगिरी महाविद्यालय ), आणि श्रीमती अर्चना एस. गिरी (सहयोगी प्राध्यापिका, शारीरीक शिक्षण महाविद्यालय ). यांच्याही मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योगा, ध्यान साधना, स्वसंरक्षण आणि आहार-पोषणाबद्दल विविध कार्यशाळा व प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट महिला सशक्तीकरण, त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची वाढ, आणि आहार व पोषणाच्या महत्वाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये अत्यधिक उत्साहाने सहभाग घेतला आणि या कार्यशाळांद्वारे त्यांना शारीरिक आणि मानसिक सशक्तीकरणाची प्रेरणा मिळाली.
सदर कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये महिलांच्या सामाजिक व मानसिक विकासाबद्दल जागरूकता निर्माण केली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.