सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संचालित सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय, ओमेगा हॉस्पिटल आणि ओम चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर यांच्या सहकार्याने १२ मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला या कार्यक्रमाची थीम “आपल्या परिचारिका, आपले  भविष्य: परिचारिकांची काळजी अर्थव्यवस्था मजबूत करते.” हि होती. फ्लॉरेन्स नाईटिंगेलच्या आत्म्याचे आणि परिचारिकांनी जगात आणलेल्या करुणेच्या शाश्वत प्रकाशाचे प्रतीक असलेल्या दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर  स्वागत नृत्य सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ विंकी रुघवानी हे होते. त्यांनी आपल्या भाषणात  रुग्णसेवेची जीवनरेखा म्हणून परिचारिकांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले, त्यानंतर ओमेगा हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ चैतन्य शेंबेकर यांनी परिचारिका या आरोग्यसेवेचा खरा कणा असल्याचे वर्णन केले. महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रूपा अशोक वर्मा यांनी  स्वागत भाषण दिले, त्यांनी जागतिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये परिचारिकांच्या अपूरणीय भूमिकेवर प्रकाश टाकला.

Advertisement

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्थानीय व्यवस्थापण समितीचे सदस्य श्रीकांतजी चितळे, श्रीकांतजी गाडगे तसेच डॉ मनिषा शेंबेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, ओमेगा हॉस्पिटल नागपूर हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि आणि ओमेगा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी एका आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे त्यांची सर्जनशीलता आणि उत्साह दाखवला. एकूण सात समूह नृत्य, चार एकल नृत्य सादरीकरणे आणि पाच एकल गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, कलाकारांच्या विविध प्रतिभांचे आणि उत्साही सहभागाचे दर्शन घडवले.

हा समारंभ केवळ नर्सिंगच्या उदात्त व्यवसायाला आदरांजली वाहत नाही तर प्रत्येक परिचारिकेचे त्यांच्या अतूट समर्पण, करुणा आणि मानवतेसाठी अथक सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आरोग्यसेवेचे हृदय असलेल्या आपल्या सर्व परिचारिकांना मनापासून सलाम.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर पायल टेंभूर्णे आणि प्रोफेसर झिनीशा बावणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रोफेसर इस्टर नाडेकर यांनी केले.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ रूपा वर्मा यांचा मार्गदर्शनाखाली प्रोफेसर नॅन्सी डोमिंगो व त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page