मिल्लीया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई – परिषद संपन्न
स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात आपल्या घरापासून व्हावी – एच एस मकदूम
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जेंडर सेंसीटायझेशन सेल व अंतर्गत तक्रार समिती ( Internal complaint committee) यांच्या संयुक्त विद्यमाने दि 17 ऑगस्ट 2024 शनिवार रोजी जेंडर इक्वलिटी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन सोसायटी (लैंगिक समानता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम) (Gender Equality and it’s impact on society ) या विषयावर आंतरराष्ट्रीय ई- परिषद संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजी़ल, उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ हुसैनी एस एस प्रमुख अतिथी म्हणून डॉ सय्यद शहा मोईनोद्दीन हुसैनी (उपाध्यक्ष व प्रमुख आर आणि डी, देउराली, जनता फार्मास्युटिकल, काठमांडू, नेपाळ) इंजिनीयर एच एस मकदूम (प्रगत प्रकल्प अभियंता, हनीवेल ऑटोमेशन पर्थ, ऑस्ट्रेलिया) संयोजक प्रो सय्यदा सीमा हाश्मी, आयोजक सचिव प्रा शोएब पीरजादे, प्रा शेख नईम यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजी़ल यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचा मुख्य हेतू वैद्यकीय विज्ञान नुसार स्त्री-पुरुष समानता समजावी व जेंडर इक्वलिटी बद्दल सखोल माहिती व्हावी हा आहे. प्रमुख अतिथी डॉ सय्यद शहा मोईनोद्दीन हुसैनी (उपाध्यक्ष व प्रमुख आर आणि डी, देउराली,जनता फार्मास्युटिकल, काठमांडू, नेपाळ) यांनी स्त्री-पुरुष समानता ही आजच्या काळाची गरज आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतीबंधक, प्रतिबंध, तक्रार समिती, स्थानिक तक्रार समिती, निवारण कायदा विषयी उदाहरणासह माहिती दिली.
तसेच संमेलनासाठी निवड केलेल्या विषयाचे कौतुक केले. इंजिनीयर एच एस मकदूम (प्रगत प्रकल्प अभियंता, हनीवेल ऑटोमेशन पर्थ, ऑस्ट्रेलिया) यांनी जेंडर इक्वलिटी, जेंडर संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्त्री- पुरुष समानता तसेच महिलांचा लैंगिक छळ म्हणजे काय याबाबत जनजागृती करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे व महिलांचा लैंगिक छळ थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत इत्यादी विविध मुद्द्यावर मार्गदर्शन केले. स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी आणि लिंगाचा अर्थ असा नाही की फक्त स्त्री-पुरुष भेदभाव आहे. भावनिक भेदभाव हा देखील लैंगिक समानतेवर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे असे सांगितले.
आंतरराष्ट्रीय ई-परिषदेसाठी 80 पेक्षा जास्त विद्यार्थी – विद्यार्थिनी, संशोधक, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक वृंद यांनी सहभाग घेतला. द्वितीय सत्र हे विद्यार्थ्यांचे पोस्टर सादरीकरणाचे होते 10 पोस्टर प्राप्त झाले त्यापैकी तीन टॉप पोस्टर्स निवडण्यात आले, प्रथम पुरस्कार 1500 ₹ मुनशरीन जावेद शेख (एन एस सी विज्ञान महाविद्यालय नाशिक), द्वितीय पुरस्कार 1000 ₹ इक्रा इरम वाजेद अली बागे (मिल्लीया महाविद्यालय, बीड) व तृतीय पुरस्कार 700₹ सिया योगेश बुंदेले (स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड) यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक प्रो सय्यदा सीमा हाश्मी यांनी तर आभार प्रदर्शन बीएससी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सय्यद इफ्राह अखिल हिने व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ सलीम बीन महफुज, सचिव खान सबिहा, महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इलयास फाजील, संगणकशास्त्राचे प्रा शेख नईम, प्रो अब्दुल समद, डॉ मोहम्मद असेफ इक्बाल, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.