देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
छ्त्रपती संभाजीनगर : वाणिज्य विभाग देवगिरी महाविद्यालय आणि वाणिज्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन “शाश्वत व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योजकतेचे अर्थशास्त्र” या विषयावर दि. २६ व २७ मार्चला करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष इंजिनियर प्रमोद खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे होते. या प्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश भांडवलदार यांची विशेष उपस्थिती होती तर बीजभाषक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक शंकर जाधव यांची उपस्थिती होती.
उदघाटनपर भाष्य करतांना इंजि. प्रमोद खैरनार म्हणाले कि, आम्ही लोकांना निवास सुविधा पुरविणाऱ्या बांधकाम क्षेत्रात काम करतो, हे एक चांगले काम आहे परंतु दुसऱ्या बाजूला विचार केल्यास पर्यावरणाची सर्वाधिक हानी हि ह्याच क्षेत्रामुळे होत आहे, हे या क्षेत्रासमोरील मुख्य आव्हान आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. व्यवसाय असो की इतर कोणतेही क्षेत्र शाश्वत विकास करण्यासाठी सर्वांनी पर्यावरणाची काळजी घ्यावी. रियल इस्टेट उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञान अलीकडच्या काळात खूपच विस्तारले असून जस जसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसा त्याचा पर्यावरणावर लक्ष्यणीय परिणाम होत आहे. बीजभाषक शंकर जाधव यांनी आपल्या भाषणात, व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण व उद्योजकता यांचा शाश्वत विकास करायचा असेल तर पारंपरिक बंधनातून बाहेर पडावे लागेल आणि नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. संशोधकांनी संशोधन करत असताना नाविन्य निर्मितीवर भर दिला पाहिजे असे उद्गार याप्रसंगी काढले.
प्राचार्य प्रो अशोक तेजनकर असे म्हणाले की, भारताने कॅशलेस इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे, तसेच ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे भारताचे स्वप्न आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत आणि असतील. प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठी सर्व आव्हाने आणि संधींना प्रकाशझोतात आणणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर सय्यद अझरुद्दीन यांनी केले. परिषेदेच्या पहिल्या परिसंवादामध्ये प्रो सय्यद अझहरुद्दीन यांनी शाश्वत व्यवसाय उद्योजकतेसाठी कौशल्य आणि पुन: कौशल्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य नंदकुमार राठी तर समन्वयक म्हणून डॉ विवेक वायकर यांनी काम पाहिले . परिषदेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन घेण्यात आलेल्या विविध सत्रात ७२ शोधनिबंधाचे संशोधक विध्यार्थी व प्राध्यापकांनी सादरीकरण केले. शोधनिबंध सादरीकरण सत्रात प्रो विकास चौधरी, प्राचार्य डॉ प्रसाद मदन यांनी सत्राचे अध्य्क्षस्थान भूषविले तर डॉ अविनाश धोत्रे यांनी ऑनलाईन शोधनिबंध सादरीकरण सत्राचे समन्वयक म्हणून तर डॉ भाऊसाहेब शिंदे यांनी ऑफलाईन शोधनिबंध सादरीकरण समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली.
परिषेदेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात संतोष बोर्डे यांनी बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या विविध प्रकारच्या संधी यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले या सत्राचे अध्यक्ष स्थान प्रो सत्यप्रेम घुमरे यांनी भूषविले तर समन्वयक म्हणून डॉ लक्ष्याकौशिक पुरी यांनी काम पाहिले. आंतराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात एम सी इ डीचे डी यु थावरे, विभागीय अधिकारी यांनी नवीन उदयोजक कसा निर्माण करायचा आणि त्याना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत तसेच एम सी इ डीच्या उदयोकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली आणि उदयोग व्यवसायचा शाश्वत विकास कसा होईल ते सांगितले.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक तेजनकर हे होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी या आंतराष्ट्रीय परिषदेचे यशस्वीपणे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजक टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उकृष्ट शोधनिबांधचे सादरीकर करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या परिषेदचे प्रो दिलीप खैरनार हे आयोजन सचिव म्हणून तर प्रो राजेश लहाने हे संयोजक म्हणून होते. सह संयोजक म्हणून प्रो कैलास ठोंबरे आणि प्रो सय्यद अझहरुद्दीन यांनी काम पहिले. या परिषेदेमध्ये 178 संशोधक विद्यार्थांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. परिषेदेच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या परिषदेच्या आयोजनासाठी प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रो दिलीप खैरनार, डॉ अनिल आर्दड व डॉ अपर्णा तावरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ लक्ष्यकौशिक पुरी यांनी केले तर डॉ प्रणिता चिटणीस यांनी आभार मानले.