संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी व मानवाधिकार दिन उत्साहात साजरा

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आणि मानवाधिकार दिन विशेष उपक्रमांतर्गत साजरे करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात स्वच्छता, श्रमदान, कचरा व्यवस्थापन जनजागृती आणि वृक्षतळ साफसफाई अशा सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी दर्शविली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. के.बी. नायक होते. त्यांनी भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीस मोठा अडथळा असल्याचे सांगत तरुणांनी प्रामाणिकपणा, नैतिकता आणि उत्तरदायित्व जपण्याची गरज व्यक्त केली. तसेच मानवाधिकारांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मानवाधिकारांची व्याप्ती, संविधानातील तरतुदी आणि संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

संचालन कु. एन.एन. काळे यांनी केले तर आभार कु. साक्षी भगत यांनी मानले. कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com