मिल्लिया महाविद्यालयाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे – पंडित चव्हाण (जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड)
बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा-2024 चे उद्घाटन प्रमुख पाहुणे पंडित चव्हाण (जिल्हा क्रीडा अधिकारी,बीड) यांच्या हस्ते चंपावती क्रीडा मंडळ येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर एस एस हुसैनी, उपप्राचार्य तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ सय्यद हनीफ, प्रवीण डिग्रसकर, शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ शंकर धांडे, डॉ. सानप, डॉ राम जाधव, विद्यापीठ पंचप्रमुख म्हणून प्राध्यापक डॉ. सुनील गायसमुद्रे , डॉ. प्रवीण गायसमुद्रे, प्रा. दत्तापूर, गोरख शेळके, चंपावती क्रीडा मंडळाचे सदस्य प्रा. गोपाळ धांडे, मेहकर कॉलेज कळंबचे प्रा. गफाट, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अताऊल्ला जागीरदार यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांनी खेळ खेळण्यासाठी वयाचे बंधन नसते, इच्छा, ध्येय, शक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खेळ हे जीवनाला कलाटणी देणारे आहेत, प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याविषयी जाणीव झाली पाहिजे. लॉन टेनिस हा खेळ व्यावसायिक आहे, या खेळामध्ये जितके तुम्ही प्रयत्न कराल, तितकी तुमची चांगली प्रगती होईल, तसेच विद्यार्थ्यांनी विविध आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस. यांनी खेळाडूंनी खेळ हा फक्त खेळाच्या भावनेनेच खेळावा. खेळ खेळणे शारीरिक व मानसिक संतुलनासाठी चांगले असते. विद्यार्थ्यांमध्ये खेळासाठी जागृती निर्माण व्हावी, तसेच लॉन टेनिस खेळायला प्रोत्साहन दिले पाहिजे तरच चांगले खेळाडू तयार होतील असे सांगितले. या स्पर्धेमध्ये एकूण अकरा संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस.डी.बी. मोहेकर महाविद्यालय कळंब व द्वितीय क्रमांक एम.आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांना मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रिडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. सय्यद हनिफ यांनी केले तर आभार प्रा.मोमीन फसियोद्दीन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. फारुख सौदागर, डॉ. सायरी अब्दुल्ला, विविध महाविद्यालयाचे क्रिडा संचालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.