नागपूर विद्यापीठात नैतिकता आणि मूल्यांनुसार जगण्यासाठी आंतरिक विकास कार्यशाळा

आंतरिक विकासातून चांगल्या समाजाची निर्मिती – किरण गांधी यांचे प्रतिपादन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नैतिकता आणि मूल्यांनुसार जगण्यासाठी आंतरिक विकास’ या विषयावरील कार्यशाळा रामानुजन सभागृह येथे शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडली. विद्यापीठ आयक्यूएसी विभाग आणि आयओएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना किरण गांधी यांनी आंतरिक विकासातून चांगल्या समाजातील निर्मिती शक्य असल्याचे सांगितले.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयक्यूएसी संचालक डॉ स्मिता आचार्य यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयओएफसीचे किरण गांधी, निरंजना गांधी, कनिका अरोरा यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कनिका अरोरा यांनी प्रात्यक्षिकातून समाजामध्ये परस्पर समन्वयाची कशी गरज आहे, याचे महत्त्व पटवून दिले. मार्गदर्शन करताना किरण गांधी यांनी जगात चांगल्या समाजाची निर्मिती करायची आहे. त्याची आपण कल्पना करतो. समस्यांची सोडवणूक करीत प्रयत्न करतो. मात्र, मनुष्याच्या परिवर्तनाशिवाय जग बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले. नैतिकता आणि मूल्यांनुसार जगण्यासाठी आंतरिक विकासातून चांगल्या समाजाची निर्मिती शक्य आहे. समाजाच्या विकासासाठी विविध धोरणे आखली जातात. धोरण बनविल्याने परिवर्तन होतेच असे नाही. लोकांची नैतिकता बदलेल तेव्हाच समाज बदलेल असे ते म्हणाले. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी स्वतः पासून बदलास सुरुवात करा, असे ते म्हणाले.

अंतरिक विकासाचे सूत्र सांगताना पवित्रता, इमानदारी, निस्वार्थता व प्रेम हे ४ नैतिक मापदंड त्यांनी सांगितले. यावरून आपण स्वतःची ओळख करू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी आयओएफसी पथकातील सदस्यांनी त्यांचे वेगवेगळे अनुभव विशद करीत स्वतःपासून बदलाची सुरुवात केल्याचे सांगितले. आयक्यूएसी संचालक डॉ स्मिता आचार्य यांनी पथकातील सर्व सदस्यांचे स्वागत करीत विद्यापीठात कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडल्या बाबत सर्वांचे आभार मानले. कार्यशाळेला विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील शिक्षक संशोधक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page