शिवाजी विद्यापीठात भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन शिवाजी विद्यापीठात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन व विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलगुरूंसह मान्यवरांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प वाहून अभिवादन केले.

India's 75th Republic Day celebrated with enthusiasm at Shivaji University

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खडरेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक      डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, व्यवस्थापन परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य सिध्दार्थ शिंदे, प्रभारी सुरक्षा अधिकारी वसंत एकले  यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com