अमरावती विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

देशाच्या शैक्षणिक विकासामध्ये सर्वांचे योगदान महत्वाचे – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठात ध्वजारोहण

अमरावती : देशाच्या शैक्षणिक विकासामध्ये सर्वांचे विशेषत: शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक विकासामध्ये दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सर्व शिक्षक व विद्यार्थी या योगदानामधील सातत्य कायम ठेवतील. विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी ध्वजारोहण केले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ध्वजस्तंभाजवळ प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर व पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ तनुजा राऊत आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले, 15 ऑगस्ट, 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्ण काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग, परिश्रम, हालअपेष्ठा, बलिदान दिले आहे. भारतीय संविधान 1950 ला लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही नांदत आहे. सर्वांना समान संधी, अधिकार प्राप्त झाले आहेत. अधिकारासह कर्तव्यांची जाणीव सर्वांनी ठेवावी. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध रॅली व पथनाट¬ाच्या माध्यमातून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली व स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Advertisement

‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमांतर्गत पाचही जिल्ह्रांत रासेयोच्या विद्यार्थ्यांनी मोठ¬ा प्रमाणावर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन केले आहेत. वृक्ष लागवड चळवळीत मोठ¬ा प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांचा महत्वाचा सहभाग यात राहील, असा वि·ाास कुलगुरूंनी व्यक्त केला. चान्सलर इव्हेंंट्स अंतर्गत आव्हान 2024 आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे विद्यापीठाच्या यजमान पदाखाली होत आहे. आदिवासींच्या विकासाकरीता मेळघाट येथे आदिवासी विकास केंद्र स्थापनेचा प्रस्ताव तयार केला असून त्याकरीता शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. लोणार विज्ञान केंद्राकडून आवर्ती खर्चाकरीता 4.5 कोटी आणि उपकरणांसाठी 1.2 कोटी शासनाकडून प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.

विद्यापीठ परिसरात वनस्पती आणि प्राण्यांची निर्देशिका तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. तसेच विद्यापीठात संग्रहालय स्थापन करण्याकरीता आणि त्यासाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून इंटर इन्स्टिट¬ुशनल प्रोजेक्ट अंतर्गत विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील डॉ अनिता पाटील यांना संशोधनाकरीता 82 लक्ष रुपये मंजूर झाले असून त्यांनी व त्यांच्या सहकारी संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाला 3 पेटेन्ट मिळाल्याबद्दल कुलगुरूंनी अभिनंदन केले. विद्यापीठातील शिक्षक संशोधनावर भर देवून जास्तीतजास्त पेटेन्ट मिळवतील, असा वि·ाास कुलगुरूंनी व्यक्त केला.

विद्यापीठाला पी एम उषा प्रोजेक्ट अंतर्गत विद्यापीठातील पायाभूत सुविधा व बांधकामासाठी 16 कोटी, रिनोव्हेशन व अपग्रेडेशन साठी 1.45 कोटी, वैज्ञानिक उपकरणांची खरेदी 1.2 कोटी, सॉफ्ट कम्पोनंंटकरीता 85 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी 15 एकर जमीन शासनाने मंजूर केली आहे. 17.5 कोटी रुपयाचे प्रस्तावित बांधकाम लवकरच सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग व बलीदान देणा­या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करुन कुलगुरूंनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. संचालन पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ तनुजा राऊत यांनी केले. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page