राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त खुप सुंदर देश भक्तीपर गीत सादर केले

घोडेगाव : स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय घोडेगाव, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव खुलताबाद, जि छ संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ०७:०० वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी घोडेगावात निघाली.

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव, मुख्य अतिथी म्हणून डॉ प्रियंका ताई साईनाथ पाटील जाधव, (MDS) संस्थेचे पदाधिकारी प्रकाश पा जाधव, कारभारी पा जाधव (पोलीस पाटील घोडेगाव), ग्रंथालयाचे ग्रंथपाल द्वारकादास पा जाधव, दिलीप जाधव, मनोज पा दळे, सुरेश गोरे, दादाभाई शेख, पांडुरंग जाधव, अंबादास पा दळे हे उपस्थित होते .

Advertisement

सद्गुरू जनेश्वर माध्यमिक येथे मुख्य अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र पाटील जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. तर वरीष्ठ महाविद्यालय येथे डॉ प्रियंका ताई साईनाथ पाटील जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त खुप सुंदर देश भक्तीपर गीत म्हटले व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर “मुख स्वच्छता व आपले आरोग्य” या विषयावर डॉ प्रियंका जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून खुप सुंदर असे मार्गदर्शन केले चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे, शंकेचे निरसन केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर मॅडम यांनी केले. आभार प्रशासकीय अधिकारी संजय गोमलाडु सरांनी मानले.

मुख्य अतिथींच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यास, प्रशासकीय अधिकारी संजय गोमलाडु सर, प्राचार्य डॉ डी डी घुगे सर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page