स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार
घरोघरी तिरंगा मोहिमेनिमित्त कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर गुरुवारी (दि १५) सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह संवैधानिक अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शासनाच्या वतीने निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमेचे उद्घाटन मंगळवारी (दि १३) सकाळी करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे यांच्यासह, प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा अधिकारी बाळू इंगळे यांनी सोहळ्याचे संचालन केले .